स्वयंघोषित ‘बाबा’ ऋषिकेश वैद्यचा कोठडीत ‘देवभक्ती’चा बनाव; न्यायालयाने दाखवला दणका, नेमकं काय घडलं?


पुणे : नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर वसईचा स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य याचा कारनामा उघडकीस आला होता.’मी महादेवाचा अवतार आहे आणि तू पार्वती आहे’ असं म्हणत महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. त्याने कोर्टाकडे पोलिस कोठडीत धार्मिक पूजा करण्यासाठी साहित्य आणि पुस्तकं मिळावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने त्याने केलेला हा अर्ज फेटाळून लावला आहे.

काय आहे प्रकरण?

ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूविरोधात एका महिलेने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पीडित महिला ३५ वर्षांची असून ती पुण्यात राहते. हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी ऋषिकेश वैद्यला पिंपरी येथून अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश वैद्यने पोलिस कोठडीत पूजा अन् अर्चना करता यावी म्हणून कोर्टाकडे विनंती केली. धार्मिक पूजा, अर्चना करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पुस्तकं मिळावी अशी मागणी त्याने केली आहे. पण कोर्टाने त्याने केलेली मागणी फेटाळून लावली. कोर्टाने ऋषिकेश वैद्यला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलीस कोठडीत पूजेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला नाही. तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाने सुरक्षितेच्या कारणासह त्याला विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!