सोन्याला पुन्हा चकाकी! प्रति तोळ्यामागे 1030 रुपयांनी वाढ,22 अन् 24 कॅरेटसाठी किती पैसे?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलच्या युद्धाने आता सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर घसरले होते त्यानंतर आज सोन्याचे दर वाढले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 1030 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

ऐन लग्नसराईच्या काळात पुन्हा सोन्याचे दर वाढायला लागल्याने खरेदीदारांना टेन्शन आलं आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 1030 रुपयांनी वाढले आहेत. हे दर 1,49,290 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 824 रुपयांनी वाढले असून हे दर 1,19,432 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे 10,300रुपयांची वाढ झाली आहे.
22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 950 रुपयांनी वाढले आहेत. हे दर 1,38,850रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 760 रुपयांनी वाढले आहे. हे दर 1,09,480 रुपये झाले आहेत. 10 तोळ्यामागे सोनं 9500 रुपयांनी वाढले असून हे दर 13,68,500 रुपये झाले आहेत.

आज 18 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 780 रुपयांनी वाढले आहेत. हे दर 1,11,970 रुपये झाले आहेत. 8 ग्रॅममागे सोन्याचे दर 624 रुपयांनी वाढले आहेत. हे दर 89,576 झाले आहेत. 10 तोळ्यामागे सोन्याचे भाव 7800 रुपयांनी वाढून11,19,700 रुपये झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.