मोठी बातमी! नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी पहिला गुन्हा दाखल; नेमकी कारवाई कुणावर? काय आहेत गंभीर आरोप?


पुणे : मंत्री नरहरी झिरवळ हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांच्या कार्यालयातील लिपिकाने लाच घेतल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच एका कथित व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील सर्व आरोप झिरवळ यांनी ठामपणे फेटाळले आहेत.

या व्हिडिओमध्ये तृतीयपंथी पवन यादव मंत्र्यांसोबत दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, या प्रकरणात मुंबईतील कफ परेड पोलिसांनी पहिली ठोस कारवाई करत व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या तक्रारीनंतर तिच्या भावाविरोधात मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यापूर्वी त्यात छेडछाड (एडिट) केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व बाबींच्या आधारे पोलिसांनी पहिली कायदेशीर कारवाई केली आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात नवे तपशील समोर आले आहेत. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केल्याची तक्रार करण्यात आली असून, त्याआधारे पवन यादवच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, “FDA मध्ये नोकरी लाव, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करू” अशी धमकी पवन यादव याला देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या इतर व्यक्तींवरही कारवाई होणार का, याबाबत सध्या चर्चा रंगली असून पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात असला, तरी तो आताच समोर आणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या मंत्र्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.

महायुतीतील सत्तासंतुलन आपल्या बाजूने ठेवण्यासाठीच अशा प्रकारची प्रकरणे जाणीवपूर्वक बाहेर आणली जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या कथित व्हिडिओमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तसेच दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ दिसत असल्याचा दावा आहे.

त्यांच्या आजूबाजूला तृतीयपंथी पवन यादव वावरताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्या ठिकाणी खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणातील सत्यता, व्हिडिओची वेळ आणि त्यामागील नेमके हेतू काय आहेत, याबाबत आता तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!