वरुण धवनच्या चिमुकलीला दुर्मिळ आजार, अभिनेत्याचा शॉकिंग खुलासा; म्हणाला, माझ्या लेकीला नीट चालताही येत नाही…


मुंबई : बॉलिवूडचा हँडसम हंक वरुण धवन त्याच्या कॉमिक सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. अनेक फिल्म्समध्ये त्याने विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. सतत हसतमुख राहणाऱ्या वरुणने नुकतंच त्याच्या आयुष्यातील अतिशय दुःखद घटनेचा खुलासा केला आहे.

वरुणची दीड वर्षांची चिमुकली मुलगी लारा धवन एका गंभीर शारीरिक व्याधीने त्रस्त असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. ‘डेव्हलपमेंटल डिस्प्लेजिया ऑफ द हिप’ या आजारामुळे लाराला शारीरिक हालचाली करताना प्रचंड वेदना होत होत्या, ज्याचा खुलासा वरुणने ‘बी अ मॅन, यार’ या पॉडकास्टमध्ये केला आहे.

वरुणने दिलेल्या माहितीनुसार, या आजारामध्ये बाळाच्या नितंबाचे हाड सांध्यातून बाहेर येते. यामुळे एका पायाची लांबी दुसऱ्या पायापेक्षा कमी होते आणि मुलांची चाल वाकडी होते. या समस्येमुळे लाराला नीट चालणे किंवा धावणे कठीण झाले होते.

वेळीच उपचार न मिळाल्यास भविष्यात संधिवात आणि स्लिप डिस्क सारख्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. भारतात यावर मर्यादित ठिकाणी उपचार उपलब्ध असले, तरी वरुणने योग्य तज्ज्ञांच्या मदतीने आपल्या मुलीवर उपचार केले आहेत.

या आजारावर उपचार करण्यासाठी लाराला कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेची गरज भासली नाही, मात्र तिला एका कठीण प्रक्रियेतून जावे लागले. डॉक्टरांनी हाडाची रचना पुन्हा योग्य ठिकाणी करण्यासाठी तिला भूल दिली आणि त्यानंतर तिला ‘स्पायका कास्ट’ मध्ये ठेवले.

या अवस्थेत तिला सलग अडीच महिने राहावे लागले, जे एका लहान मुलासाठी अत्यंत वेदनादायी आणि आव्हानात्मक होते. अडीच महिन्यांच्या उपचारानंतर आता तो कास्ट काढण्यात आला असून तिची प्रकृती सुधारत आहे.

आपल्या मुलीने आणि कुटुंबाने जो त्रास सहन केला, त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी त्याला एक पुस्तक लिहायचे आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात या आजाराबद्दल असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे पालकांची होणारी ओढाताण त्याने जवळून पाहिली आहे. हे पुस्तक इतर पालकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्याला वाटतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!