अजित पवार यांच्या विमान अपघाताला दोन महिने पूर्ण झाल्यानंतर VIP उड्डाणांसाठी कठोर नियम जाहीर, आता पायलटचा निर्णय…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चौघांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झाले. यानंतर चौकशीत अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. यानंतर अनेक आरोप देखील करण्यात आले. लियरजेच 45 हे विमान कोसळून हा अपघात झाला होता. त्यानंतर आता DGCA ने व्हीव्हीआयपी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी विमानांसाठी कठोर नियम जाहीर केले.

यावेळी पायलटने घेतलेला निर्णय अंतिम असून कोणीही या निर्णयाला आवाहन देऊ शकत नाही अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. या नियमांचे उल्लंघन केल्यास विमान कंपन्यांच्या परवान्यांसह वैमानिकांचे लायसन्स देखील रद्द होऊ शकतात, असेही सांगितले गेले आहे.
कोणत्याही तांत्रित कारणामुळे पायलटने विमान उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला तर त्या निर्णयाचे उल्लंघन करू नाही शकत. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. विमान क्रूवर उड्डाणांसाठी अनावश्यक दबाव टाकल्यामुळे सुरक्षिततेवरती परिणाम होतो, असेही म्हटले आहे.

दरम्यान, अती महत्वाच्या प्रवाशांनी शेवटच्या क्षणी केलेल्या जाणाऱ्या बदलांमुळे क्रुवरती दबाव आला नाही पाहिजे. काही बदल असतील तर विमान कंपनीच्या व्यवस्थापनामार्फत केल्या पाहिजेत आणि कॉकपिटपर्यंत काही पोहचू नये, असेही म्हटले आहे.
तसेच उड्डाण कर्मचाऱ्यांवर उड्डाण करण्यासाठी दबाव आणला जाणार नाही. ज्यामुळे सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. असे आदेशात म्हटले आहे. व्हीआयपी आवश्यकतांमुळे नियोजित उड्डाणात शेवटच्या क्षणी होणारे कोणतेही बदल केवळ संस्थेच्या व्यवस्थापनामार्फतच समन्वित केले जावेत, असेही सांगितले आहे.