लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी!दर महिन्याला मिळणार आता 2500 रुपये, कोणी केली घोषणा?

दिल्ली: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर या योजनेचा बोलबाला संपूर्ण राज्यात झाला. त्यानंतर आता केंद्र सरकारने सुरू केलेल्या महिला समृद्धी योजनेची चर्चा रंगू लागली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 2500 रुपये दिले जाणार आहेत.

दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. गरीब कुटुंबातील महिलांवर आर्थिक ताण येऊ नये, यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 2500 रुपये दिले जातात. या योजनेमुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. या योजनेसाठी सरकारने 5100 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात खडखडाट होणार आहे.
दिल्ली सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ 21 ते 59 वयोगटातील महिला घेऊ शकतात. योजनेची लाभार्थी महिला कमीत कमी 5 वर्ष दिल्लीची रहिवासी असावी. या योजनेच्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 ते 3 लाखांपर्यंत असावे. कुटुंबातील कोणीही टॅक्स भरत नसावे. महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नसावी. दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी.

सरकारने योजनेची घोषणा केली आहे.या योजनेसाठी प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. यानंतर महिलांचे रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे.