खरात प्रकरणाची व्याप्ती वाढली!चाकणकरानंतर आता एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची पडणार विकेट?


मुंबई : नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातचे धक्कादायक कारनामे उघड होत असताना अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच या प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता याप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याची विकेट पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वात पहिले प्रवक्ते दीपक केसरकर यांची नाशिकमधील सिन्नर येथील केवळ ईशान्येश्वर महादेव मंदिरात घराची ओळख झालेली होती. दीपक केसरकर यांचे खरात सोबतचे तीन फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी केसरकरांवर गंभीर आरोप केले आहेत. केसरकर खरातचे निस्सीम भक्त होते, खरातच्या सांगण्यावरून मंत्रालयात जायचे-न जायचे ठरवायचे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. खरात मंत्रालयाच्या कामात केसरकरांच्या माध्यमातून हस्तक्षेप करायचे असाही आरोप केला जात आहे.

दरम्यान याआधी दीपक केसरकरांचा खरातच्या मुलीच्या लग्नातील एक फोटो व्हायरल झाला. तसेच खरात स्वत: ईशान्येश्वर मंदिरासाठी रस्त्याची मागणी करण्यासाठी केसरकरांना भेटलेला तेव्हाचा आहे. हा रस्ता बांधून देण्यात आला असून यामागे केसरकर कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पदोन्नती, ट्रान्सफरसारख्या गोष्टींचा समावेश होता.

खरात आठवड्यात दोन दिवस केसरकरांच्या सरकारी बंगल्यावर मुक्काम करायचे, असाही आरोप केला जात आहे. केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची एसआयटी चौकशी सुरू असून या चौकशीचा जमीन व्यवहाराशी संबंध आहे का अशी शंका ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता केसरकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला असल्याने त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!