ऑनलाइन पेमेंट आता ‘डबल ‘सुरक्षित!रिझर्व्ह बँकेकडून 1 एप्रिल 2026पासून नियमात मोठे बदल…

पुणे: भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांत होणारी वाढती फसवणूक आणि हँकिंग रोखण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून बँकेने ऑनलाइन पेमेंट चे नियम पूर्णपणे बदलले आहेत.आता ऑनलाइन पेमेंटसाठी टू व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता प्रत्येक व्यवहारासाठी दोन स्तरावर पडताळणी करणं गरजेचं आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार, पेमेंट करताना पासवर्ड, पिन, ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीचा वापर करावा लागणार आहे. ग्राहकांना आता या पद्धतीने वेरिफाय करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. डिजिटल व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे
रिझर्व्ह बँकेने रिस्क बेस्ड ऑथेंटिकेशन लागू केले आहे. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शननुसार सुरक्षेचा स्तर निश्चित केला जाणार आहे. जर लहान रक्क्कम असेल तर कमी पडताळणी होणार आहे. मोठ्या रक्कमेसाठी तुम्हाला ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे. याचसोबत आंतरराष्ट्रीय पेमेंटवरही हे नियम लागू होणार आहेत.

ऑनलाइन पेमेंटच्या या नियमानुसार आता यूपीआय,क्रेडिट- डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे पाठवताना केवळ एक पासवर्ड पुरेसा असणार नाही. एक एप्रिल 2026 पासून यूपीआय,कार्ड पेमेंट,नेट बँकिंग आणि वॉलेट व्यवहारांनाही नियम लागू होतील. परदेशी वेबसाईट किंवा ॲप्स वर केल्या जाणाऱ्या पेमेंटसाठी हे नियम एक ऑक्टोंबर 2026 पासून लागू होणार आहेत.