पॅन कार्ड बनवणे होणार कठीण! 1 एप्रिल 2026 पासून नियमात बदल, काय असेल प्रक्रिया?


पुणे : पॅन कार्ड संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून 1 एप्रिल 2026 पासून देशभरात पॅनकार्ड बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत केवळ आधार कार्डच्या जोरावर पॅन कार्ड मिळवणं सोपं होतं.मात्र आता नव्या आर्थिक वर्षापासून ही प्रक्रिया अधिक कडक आणि विस्तृत केली जाणार आहे.

1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड बनवण्याबाबतची ही प्रक्रिया अधिक कठोर होईल. नवीन नियम लागू झाल्यानंतर, केवळ आधारच्या आधारे पॅन कार्ड मिळवणे शक्य होणार नाही. अर्जदारांना अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतील आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक लांब असू शकते. यामुळे पॅन कार्ड मिळवणे आणखी कठीण होईल.

नवीन नियम लागू झाल्यानंतर, पॅन कार्डसाठी अर्जदारांना ओळख आणि जन्माशी संबंधित अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागू शकतात. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, दहावीचे प्रमाणपत्र किंवा इतर सरकारी कागदपत्रांचा समावेश असू शकतो. यामुळे पॅन कार्ड पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे.

31 मार्च 2026 पर्यंत, केवळ आधार कार्डच्या आधारे पॅन कार्डसाठी अर्ज करणे अगदी सोपे होते. कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नव्हती. मात्र आता नव्या बदल्याने पॅन कार्ड बनवणे अधिक कठीण होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!