गॅसचा तुटवडा संपला!हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीनना 20 टक्के अतिरिक्त गॅस ….

पुणे : इराण आणि इस्राईलच्या युद्धामुळे जगभरात गॅसचे संकट उभे राहिले.महाराष्ट्रातही घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाच आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील हॉटेल,ढाबे,उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन,अन्नप्रक्रिया दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. व्यवसायिका ना आता 20 टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा करण्यात येणार आहे.

इराण इस्त्राईलच्या युद्धामुळे अनेक व्यावसायिकांना मोठा फटका बसला.व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना आता 20 टक्के गॅस पुरवठा होणार राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तशी माहिती दिली आहे.
दरम्यान पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. यामुळे भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दरम्यान, सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमधील हॉटेल व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा मात्र अजूनही कायम आहे. लोकांना घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाही. तसेच एक गॅस सिलिंडर मिळावे यासाठी लोक अनेक ठिकाणी रांगा लावत आहेत. सरकार या अडचणीवर कशी मात करणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.