विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंना मदत करणार? एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणूक येईल तेव्हा…


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे सोमवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर दाखल झाले. काल रात्री त्यांच्या दिल्ली आगमनाने राजकारणात चर्चांना उधाण आले होते.

आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील विकास कामांच्या मुद्यावर चर्चा केली. बैठकनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत मदत करणार का याबाबत थेट भाष्य केले.

राज्यातील राज्यसभा निवडणुका बिनविरोध पार पडल्या. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेत निवडून यावे असा मतप्रवाह ठाकरे गटात सुरू आहे.

उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत मदत करणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?, असं पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आताच राज्यसभेची निवडणूक झाली. विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू, असं हसतहसत एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!