शिक्षण क्षेत्रात खळबळ! पुण्यातील प्राध्यापकाच टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण समोर…

पुणे : पुण्यातील नामांकित सिंहगड डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकांन आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आता समोर आली आहे. यातून धक्कादायक कारण समोर आल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,राजू पाटील असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकांचे नाव असून त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिंहगड डिटेल कॉलेजचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी उचललेल्या टोकाच्या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कामाचा ताण वाढल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं पाटील यांनी लिहिले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी, सिंहगड डेंटल कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली होती. शिक्षकांचे थकीत वेतन आणि शैक्षणिक नुकसानीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिंहगड दंत महाविद्यालयावर विद्यापीठाने मोठी कारवाई केली होती. कामाचा वाढता ताण यामुळे आपण आपल आयुष्य संपवत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

नामांकित कॉलेजमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या राजू पाटील यांच्या आत्महत्येची तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.त्यांच्या आत्महत्याचे हे नेमकं एवढंच कारण आहे का? कि यापलीकडे अजून कुठली कारणं आहेत का? हे समजू शकलेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.