इराण -इस्त्राईल युद्धाचा सर्वसामान्यांना फटका! गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांनी वाढ..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण इस्त्राईलच्या युद्धाची झळ आता सर्वसामान्यांच्या पर्यंत येऊन पोहोचली आहे. या युद्धामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरवाढीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.या दरवाढीमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाढलेल्या गॅस दरांचा सर्वाधिक परिणाम सामान्य ग्राहकांवर होत असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!