हवेली पंचायत समिती सभापतीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची थेट प्रदेश पातळीवरुन लॉबिंग; गळ्यात सभापतीपदाची माळ पाडण्यासाठी स्पर्धा शिगेला…


उरुळीकांचन : सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड स्पर्धा लागली असून सभापतीपदासाठी कधी नव्हे इतकी चुरस पक्षात लागली असून सभापतीची माळ गळ्यात पडावी म्हणून थेट पक्षाच्या वरिष्ठ फळीकडे लॉबिंग करण्यापर्यंत ही स्पर्धा निकोपाला गेली असून हवेलीच्या सभापतीपदासाठी स्थानिक आमदारांचा शब्द अंतिम ठरणार की, सभापतीचे नाव थेट प्रदेश पातळीवरुन अंतिम होणार म्हणून सभापतीपदाच्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सोमवार (दि.९) रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे. या पदासाठी स्वाभाविकच राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ पैकी ६ सदस्य निवडून आल्याने तसेच एका अपक्ष सदस्याने सभापतीपदासाठी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सभापतीपद हे राष्ट्रवादीकडे जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी राष्ट्रवादीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी राष्ट्रवादीकडून थेऊर गण येथून निवडून आलेले युवराज काकडे, कोरेगावमूळ गणातून निवडून आलेले मनोज चौधरी तर खानापूर गणातून विजयी झालेले युवराज वांजळे यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आले
आहेत. या इच्छुकांनी थेट पक्षाच्या प्रदेश फळीपासून लॉबिंग सुरू केल्याने सभापतीपदासाठी मोठी चुरस पक्षात पहायला मिळत आहे.

हवेली तालुक्यातील सभापतीसाठी सर्वाधिक मोठा भाग म्हणून पूर्व हवेली तालुक्यात सभापतीसाठी पक्षाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ठिकाणी पक्षाला ५ पैकी ४ जिल्हा परिषद गटांत घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार ज्ञानेश्वर कटकेंची भूमिका तपासणार असून आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या शिफारशीनुसार पक्षाला निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरणार असल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे सभापतीपदासाठी पक्षातील काही इच्छुकांनी प्रदेश पातळीवरुन हे नाव निश्चित करण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे.त्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी संपर्क सुरू झाला असल्याची चर्चा सुरू आहे. सभापतीसाठी मिळेल ती किंमत मोजून हे पद पदरात पाडूनघेण्यासाठी ही स्पर्धा वाढली असून पक्षाकडून शिस्तबद्ध पध्दतीने निवड होणार की, पक्षश्रेष्ठींना तालुक्यातील मागच्या आठवणी कटू असल्याने ताक भुंकून पिणार म्हणून या सभापतीकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

पंचायत समिती सदस्य संशोधनाचा विषय…

पंचायतराज व्यवस्थेत पंचायत समिती सदस्य सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे.एकूण व्यवस्थेत पंचायत समितीसदस्याला किती स्थान उरले आहे हा विषय चर्चेत आहे. राज्य सरकारने पंचायत समितीमार्फत येणाऱ्या योजना ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय तसेच शिक्षण, आरोग्य , कृषी तसेच पक्षुसंवर्धन विभागात कमी केलेले अधिकार व जिल्हा परिषदेच्या निधी वाटप करण्यावर देखभाल इतकेच अधिकार शिल्लक राहिल्याने पंचायत समिती सदस्यांना कामकाजात किती वाव राहणार हा मोठा प्रश्न आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!