ऑनलाईन वस्तू मागवताय? तर थांबा.. पार्सल दिलं, प्यायला पाणी मागितलं अन् मग तरुणीसोबत धक्कादायक कांड, पुण्यातील घटनेने खळबळ


पुणे : एका डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक पुण्यातील शिवाजीनगर परिसरातून समोर आली आहे. ६ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीनं ‘पोर्टर’ ॲपद्वारे सामान मागवलं होतं. सायंकाळी पाचच्या सुमारास डिलिव्हरी बॉय श्रीधर कांबळे पार्सल घेऊन तिच्या घरी पोहोचला. तरुणीनं दरवाजा उघडून पार्सल घेतलं.

त्यानंतर त्याने तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. तरुणीने माणुसकीच्या नात्यानं त्याला पाणी दिलं, मात्र याच संधीचा फायदा घेत त्यानं तिच्या हाताला स्पर्श केला आणि तू खूप सुंदर दिसतेस, असं म्हणत गैरवर्तन केले.

या घटनेवेळी घरात तरुणीची सासू आणि तिचं बाळ उपस्थित होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ आपल्या पतीला याची माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डिलिव्हरी बॉय श्रीधर कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, शिवाजीनगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!