रहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीचा बादशाह कोण?, रणवीर सिंहचा पुन्हा राडा! आदित्य धर घेऊन आले ‘धुरंधर 2’ चा जबरदस्त ट्रेलर…

मुंबई : गेली अनेक दिवस प्रेक्षक ज्या सिनेमाची वाट पाहत होते तो धुरंधर 2 अवघ्या काही दिवसांत थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या पुढील भागाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता धुरंधर 2 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
7 मार्च 2026 रोजी सकाळी 11:01 वाजता या चित्रपटाचा ट्रेलर अधिकृतरीत्या रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की हा सिक्वेल पहिल्या भागापेक्षा अधिक डार्क आणि अधिक इंटेन्स असणार आहे. दमदार व्हिज्युअल्स, थरारक अॅक्शन सीन आणि हाय-स्टेक्स ड्रामामुळे ट्रेलर प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारा ठरत आहे.

रणवीर सिंगसाठी हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण त्याने भारतात 838.5 कोटी तर जगभरात 1300 कोटींपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट आणखी मोठे रेकॉर्ड बनवेल अशी अपेक्षा आहे.

3 मिनिटं 25 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग पुन्हा एकदा त्याच्या शक्तिशाली अवतारात दिसतो. तो ‘हमजा अली’ नावाच्या रॉ एजंटच्या भूमिकेत आहे आणि पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कला उध्वस्त करण्यासाठी निघाला आहे. ट्रेलरमध्ये रहमान डकैतचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. रहमान डकैत मेल्यानंतर आता नवीन बादशाह कोण बनणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसऱ्या पार्टमध्ये रणवीर सिंह डबल रोलमध्ये दिसत आहे.
19 मार्च रोजी रिलीज होणार चित्रपट…
19 मार्च रोजी ईदला ‘धुरंधर 2’ रिलीज होणार आहे. परदेशात प्री-बुकिंग सुरू झाले असले तरी, भारतात त्याला अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेले नाही. अलिकडच्या काळात “जाना नायकन” आणि “परशक्ती” सारख्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाच्या कट आणि विलंबामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.