ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती, रात्रीत दिल्लीतून हालचाली..


मुंबई : केंद्र सरकारने गुरुवारी रात्री विविध राज्यांच्या राज्यपालांची बदली केली असून जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मध्यरात्री जाहीर झालेल्या या मोठ्या राज्यपाल फेरबदलानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

त्रिपुराच्या राजकारणात जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकीय व्यक्तिमत्व मानले जातात.त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी आगरतळा येथे झाला.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 1990 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्रिपुरात पक्षाची पायाभूत संघटना मजबूत करण्यास मोलाचे योगदान दिले.

त्रिपुरा डाव्या पक्षाचे वर्चस्व असतानाही जिष्णू देव वर्मा यांनी 1996, 1998,1999 या वर्षात त्रिपुरा ईस्ट मतदारसंघातून लोकसभा निवडणुका लढवल्या. 2018 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले.त्यांनी वित्त,ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाची जबाबदारी देखील सांभाळली. त्यांची,नियुक्ती महाराष्ट्र राज्यात लक्ष वेधून घेणारी आहे.

राष्ट्रपती भवनाने रात्री निवेदन जारी करून राज्यपालांच्या नियुक्त्या प्रसिद्ध केल्या आहेत.त्या पुढीलप्रमाणे..

– शिव प्रताप शुक्ला तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्त
– जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून वर्णी
– नंद किशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
– लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांना बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी
– आर.एन. रवी यांची आता पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
– राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे तामिळनाडूच्या राज्यपालपदी
– कविंदर गुप्ता हे आता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
– विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती
– दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून तरनजित सिंग संधू यांना संधी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!