नातवाने पिचकारीने पाणी उडवलं, आजीने चिडून उकळतं पाणी फेकलं, नागपुरात चार वर्षांचा चिमुकला गंभीर भाजला…


नागपूर : रंग, आनंद आणि उत्साहाचा सण मानली जाणारी होळी–धुळवड यंदा नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात एका धक्कादायक घटनेमुळे काळवंडली. पिचकारीने रंग उडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या आजीने आपल्याच चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी फेकल्याने तो गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे.

घटना कोराडी परिसरात घडली. या घटनेत चिमुकला तब्बल ४५ टक्के भाजला असून त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओम हरीश वांगे (वय ४) असे जखमी बालकाचे नाव

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे हा कोराडी येथील आरामशिन परिसरातील वॉर्ड क्रमांक २ मध्ये आई-वडिलांसह राहत होता. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ओम घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने रंग खेळत होता.

त्याचवेळी त्याची चुलत आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत घेऊन अंगणातून जात होत्या. खेळाच्या नादात ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. मात्र या क्षुल्लक प्रकारामुळे संतापलेल्या आजीने हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट ओमच्या अंगावर फेकली. अचानक अंगावर पडलेल्या गरम पाण्यामुळे ओम वेदनेने विव्हळू लागला.

पाण्याचा चटका इतका तीव्र होता की त्याच्या कमरेखालचा भाग गंभीररीत्या भाजला. मुलाचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्य तातडीने बाहेर धावून आले. त्यांनी ओमला त्वरित जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार, ओम सुमारे 45 टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. ओमचे वडील वेकोलीमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!