बारामती-पारवडी रस्त्यावर भीषण अपघात! पतीच्या डोळ्यादेखत पत्नी अन् मुलीचा करुण अंत..


पुणे : पुणे जिल्ह्याच्या बारामती-पारवडी रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या धडकेत दुचाकीवरील महिलेचा आणि तिच्या चिमुकल्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, बारामती-पारवडी रस्त्यावर एका दुचाकीवरून एकाच कुटुंबातील चार सदस्य जात होते. या दुसाकीला चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली.यात पती-पत्नीसह त्यांच्या दोन मुलांचा समावेश होता. मात्र या सुखी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.या धडकेत दुचाकीवरील महिलेचा आणि तिच्या चिमुकल्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, ही दुचाकी रस्त्याच्या बाजुला फेकली गेली. तर चारचाकी वाहनाचेही मोठं नुकसान झालं आहे.या अपघातात पती आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताचा नेमका कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!