अजितदादांचा सुनियोजित मर्डर, ते मोठा अडथळा…बड्या नेत्याच्या आरोपाने उडाली खळबळ


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते.

यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांचा विमान अपघात झाल्याचे कळताच सर्वांना मोठा धक्का बसला.

अजित पवारांच्या कुटुंबियांकडून सातत्याने या विमान अपघाताची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांच्या विमान अपघाताचे गूढ अधिकच गडद होताना दिसत आहेत. त्यातच आता शरद पवार गटाच्या एका नेत्याने याप्रकरणी धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित दादांचा मर्डर झालाय, यावर माझं ठाम मत बनलंय. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरुन प्रयत्न सुरु आहे, असा दावा विकास लवांडे यांनी केला आहे.

शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत. इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत हे लक्षात येईल, असे विकास लवांडे यांनी म्हटले.

विकास लवांडे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता वाद रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वीच अजित पवार यांच्या कुटुंबियांनी अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!