पुण्यात तापमानाचा पारा चढणार अन् पावसाच्या सरीही कोसळण्याची शक्यता; जाणून घ्या अधिक माहिती..


पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. पुण्याच्या हवामानात देखील सातत्याने बदल होत असून, आज शहरात संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज पुण्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून दुपारनंतर काही भागांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून येत्या काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान असल्याकारणाने थोडा उखाडा आणि पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुणे शहर आणि लगतच्या पिंपरी-चिंचवड परिसरात दुपारनंतर ढग दाटून येतील.

आज पुण्याचे कमाल तापमान 34°C ते 36°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 18°C पर्यंत खाली जाऊ शकते. सकाळी हवेत गारवा असला तरी दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका अधिक जाणवेल. मात्र, ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतेत वाढ होऊन थोडा उकाडा जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विशेषतः लोणावळा, खडकवासला आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर थोडा जास्त असू शकतो. शहराच्या मध्यवर्ती भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस किंवा पावसाच्या सरी पडण्याची शक्यता 30% ते 40% आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून थोडा दिलासा देखील मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!