इराण -इस्त्राईलच्या युद्धाचा भडका उडणार!इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्याचा मृत्यू, ४८ तासांपूर्वी स्वीकारला होता पदभार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्राईलच्या युद्धाचा भडका पेटतच चालला आहे.इस्राइलकडून इराणवर हवाई हल्ले सुरूच आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या नव्या संरक्षणमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. सय्यद माजिद अब अल-रेजा यांनी ४८ तासांपूर्वीच संरक्षणमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या नवे संरक्षण मंत्री माजिद इब्न अल-रेझाई यांच्या मृत्यूमुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. यानंतर इराणकडून थेट बदल्याचा इशारा देण्यात आला आहे.इराण सरकारने इस्रायलने केलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. संरक्षण मंत्र्यांच्या हत्येचा बदला घेतला जाणार असा थेट इशारा केला आहे.
सय्यद माजिद हे इराणच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. संरक्षण मंत्री होण्यापूर्वी त्यांनी इराणी सैन्यात ब्रिगेडियर जनरल पद भूषवले होते. त्यांना विशेषतः लष्करी प्रशासन आणि रसदशास्त्रातील तज्ज्ञ मानले जात होते.आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजिद इब्न अल-रेझाई यांना पदावर येऊन फक्त ४८ तास झाले होते. अवघ्या ४८ तासांमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

इस्रायलने एका महत्त्वाच्या इराणी लष्करी तळाला लक्ष्य केले. त्याठिकाणी सय्यद माजिद अब अल-रेजा उपस्थित होते. हल्ला इतका जबरदस्त होता की नव्या संरक्षणमंत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात प्रगत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. या संरक्षण मंत्र्यांच्या मृत्यूमुळे या युद्धाचा वनवा आणखीन पेटणार आहे.