Whats App चा नवा नियम!…. सिमकार्ड शिवाय व्हाट्सअप चालणार नाही, काय आहे सिम-बाइंडिंग?


पुणे : व्हाट्सअप युजर साठी महत्वाची माहिती समोर आली आहे. सायबर फसवणूक आणि ऑनलाईन गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला असून व्हाट्सअप वापरण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. त्यामुळे व्हाट्सअपने भारतात सिम-बाइंडिंग सुरू केले असून फोनमध्ये सिम कार्ड सक्रिय असल्याशिवाय व्हाट्सअप चालणार नाही.

केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, 1 मार्चपासून Whatsapp, टेलीग्राम आणि सिग्नल सारखे अॅप चालवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्ड लावलेले असणे खुप गरजेच आहे. सिम-बाइंडिंगशी संबंधित नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. जर तुम्ही फोन मधून सिम कार्ड काढले किंवा बदल तर व्हाट्सअप आपोआप काम करणे बंद करेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दूरसंचार विभागाने सायबर आणि बनावट नंबरच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच हे अपडेट सर्व भारतीय वापरकर्त्यासाठी अनिवार्य असणार आहे. 1 मार्चपासून, कोणीही सिम कार्डशिवाय हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स वापरू शकणार नाही. कंप्यूटरवर व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांना दर सहा तासांनी वेब व्हर्जनमधून लॉग आउट केले जाईल, त्यांना प्रत्येक वेळी लॉग इन करावे लागणार आहे.

दरम्यान WABetaInfo च्या अहावालानुसार, व्हाट्सअप च्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये या फीचरची चाचणी सुरू आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व भारतीय वापरकर्त्यांसाठी हे अपडेट अनिवार्य होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!