“आई बाबा, यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही…; बारावीच्या विद्यार्थ्यांनीची आत्महत्या करण्यापूर्वी धक्कादायक सुसाईड नोट


मुंबई : कल्याण पूर्व परिसरात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली धक्कादायक सुसाईड नोट समोर आली आहे. यामध्ये तिने “आई बाबा, यापुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही” असा मजकूर लिहला असल्याची माहिती मिळाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,अक्षरा नितीन रेणुसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.आपल्या घरातील पोटमाळ्यावर गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तातडीने तिला खाली उतरविण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेने परिसरात घडली आहे.

अक्षराच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाणे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. विद्यार्थिनीवर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण होता का, शैक्षणिक किंवा इतर कारणे होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनीच्या या दुर्दैवी घटनेमुळे शैक्षणिक ताणतणाव, मानसिक आरोग्य आणि पालक – विद्यार्थी संवाद याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!