ब्रेकिंग!शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आता रुटीन चाचण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आल आहे.या ठिकाणी त्यांच्या नियमीत केल्या जाणाऱ्या चाचण्या येथे करण्यात येणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात ठेवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली होती.त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिक मधून डिस्चार्ज देण्यात आला. आता नियमित तपासणीसाठी शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान शरद पवार यांना थोडा त्रास जाणवू लागल्याने आणि त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दुसऱ्यांदा दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. डॉक्टरने त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.