ब्रेकिंग! केरळ राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी, काय असणार नवं नाव?


मुंबई: केंद्र सरकारने एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता केरळ राज्याचे नाव बदलले जाणार आहे.त्याचे नवे नाव” केरळम” केले जाणार आहे. येत्या एप्रिल, मे महिन्यात केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केरळचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, केरळ मधील राज्य सरकारकडून केरळ नाव बदलण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाला देण्यात आला होता.या प्रस्तावावर विचार करून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता भविष्यात या राज्याला केरळम या नव्या नावानेच ओळखावे लागणार आहे.

दरम्यान याआधी केरळच्या विधानसभेत 24 जून 2024 रोजी सर्वसहमतीने केरळ राज्याचे नाव बदलून ते केरळम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव नंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. याच प्रस्तावावर आता निर्णय घेण्यात आला आहेअशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

भारतीय संविधानातील 8 व्या अनुसूचिमध्ये केरळ राज्याच्या नावात केरळम असा बदल केला जाणार आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या राज्यात भाजपाला तसेच मित्रपक्षांना काही फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!