पुण्यात स्पा सेंटरवर धाड, भीतीने मॅनेजर आणि महिलेची खिडकीतून उडी, मात्र शेवटी महिलेसोबत नको तेच घडलं..


पुणे: पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून निसटण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या अटकेच्या भीतीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या या महिलेचा प्राण गेला, तर स्पा व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे.

विमान नगरमधील रूट्स स्पावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांच्या ताब्यातून वाचण्यासाठी महिलेने आणि मॅनेजरने उडी मारली मात्र यामध्ये महिलेचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे येथील विमाननगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’वर पोलिसांनी छापा टाकताच महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विमाननगर पोलिस स्टेशनच्या पथकाने दुपारी सुमारे तीनच्या सुमारास स्पा सेंटरवर कारवाई केली. अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित ‘स्पा’मध्ये देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय केला जात होता अशी पोलिसांना माहिती मिळाली. या प्रकरणी व्यवस्थापक व मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!