नर्ससोबत प्रेमसंबंध, बिअरच्या बाटल्या अन् ४५ झोपेच्या गोळ्या, बड्या डॉक्टरचे धक्कादायक पाऊल…

मुंबई : बड्या डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली शहरात एका नामांकित रुग्णालयातील डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या आत्महत्येच्या प्रयत्नामागे एक ‘प्रेमप्रकरण’ कारणीभूत असल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे.

सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली परिसरातील एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी अत्यंत भयंकर पाऊल उचललं आहे. त्यांनी तब्बल १० बिअरच्या बाटल्या प्यायल्या आणि त्यानंतर ४५ झोपेच्या गोळ्या घेतल्या.
इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि औषधांचं सेवन केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. सुदैवाने, त्यांना वेळेवर उपचार मिळाले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

नर्ससोबत प्रेमसंबंध अन्….
संबंधित डॉक्टरचं त्यांच्याच रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. ही नर्स गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत होती. या दबावामुळे आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने डॉक्टर मानसिक तणावाखाली होते.
विशेष म्हणजे, या डॉक्टरची पत्नी देखील डॉक्टरच आहे. असं असताना त्याचे नर्ससोबत प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या या गुंत्यामुळे त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या डॉक्टरने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणाच्या त्रासामुळे उचललं? की त्यांना कोणी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.