पुण्यात खळबळ! प्रसिद्ध रुग्णालयात सापडल्या दारूच्या बाटल्या, रुग्णांच्या जीवाशी खेळ…


पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य रुग्णालय असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे पाहीले जाते. शहरातलं हे महत्वाचं सरकारी रुग्णालय. सर्व सामान्य नागरिक याच रुग्णालयात उपचारासाठी येतात.

इथं आपल्याला चांगल्या सोयी सुविधा मिळतील ही त्यांची अपेक्षा असते. पण असं असलं तरी त्यांच्या या अपेक्षा पुर्ण होताना दिसत नाहीत. उपचार सोडा इथं साधी स्वच्छता ही पाहायला मिळत नाही. कहर म्हणजे रुग्णालयाच्या परिसरातच देशी दारूच्या बाटल्यांचा खच ही आढळला आहे.

त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभा राहीला आहे. सरकारी रुग्णालय असलेल्या पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.

रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या वास्तूत ठिकठिकाणी गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसून येत आहेत. तर चक्क देशी दारूच्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील वॉर्ड आणि स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे इथे पाहणी केली असता, रुग्णालयाच्या भिंती आणि शौचालये तंबाखू-पानमसाल्याने माखलेली दिसून आल्या.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वॉर्डच्या कोपऱ्यात आणि काही ठिकाणी रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे हे रुग्णालय आहे की मद्यपींचा अड्डा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!