एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत…!! बड्या नेत्याचा मोठा गाैप्यस्फोट


पुणे : संजय राऊत यांनी नुकताच मोठा दावा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण भाजपा तसे होऊ देणार नाही. संजय राऊत यांनी अलीकडेच जोरदार विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदावर येऊ शकणार नाहीत कारण भाजप त्यास परवानगी देणार नाही. राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केले आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टवरील मत व्यक्त केले. हे आमचे सर्व सहकारी होते त्यांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केले आहे.

मात्र शिवसेना फोडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, सुप्रीम कोर्टातील अनेक न्यायाधिश हे भाजपाचे कार्यकर्ते असून त्या पद्धतीने काम करतात. दरम्यान, संजय राऊतांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या अमेरिकेतील सुप्रीम कोर्टावर झालेल्या टीकेचा उल्लेख करून, न्यायालयाशी संबंधित धोरणात्मक पक्षपात लक्षात आणून दिला.

राऊतांनी पुढे स्पष्ट केले की, विचारांची लढाई आपण विचारांनी करतो, परंतु भाजपाकडे कोणताही राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक विचार नाही. त्यांनी हेही सांगितले की, जिव नकोसा करून व्यक्तींना पक्ष बदलायला भाग पाडले जाते, आणि अजित पवार, हसन मुश्रीफ , नवाब मलिक यांच्याही बाबतीत असे झाले. असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!