एकनाथ शिंदेंच टेन्शनं वाढलं! शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकरांची पत्रातून मोठी मागणी, भेटहीं घेणार?


मुंबई : राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी मार्चमध्ये निवडणूक होणार आहे.यातील सात जागा या महाराष्ट्रातील आहेत.महाराष्ट्र विधानसभेतून रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटात हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच आता ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अत्यंत निष्ठावंत नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी या जागेसाठी आपली प्रबळ दावेदारी सादर केली आहे. पक्षातील प्रदीर्घ राजकीय अनुभव, वैधानिक कामाचा दांडगा व्यासंग आणि संघटनेवरील पकड लक्षात घेता, राज्यसभेत पक्षाची बाजू मांडण्यासाठी आपली निवड व्हावी, अशी आग्रही विनंती गजानन किर्तीकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत. यासाठी ते त्यांची भेट घेणार आहेत.तसेच याबद्दलचे एक पत्र गजानन किर्तीकर यांनी देत आपली इच्छा व्यक्त केली आहे.

कोण आहेत गजानन कीर्तिकर?

शिवसेनेचे ज्येष्ठ आणि अत्यंत निष्ठावंत नेते म्हणून गजानन कीर्तिकर ओळखले जातात. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. केवळ संसदीय राजकारणच नव्हे, तर संघटनात्मक पातळीवरही त्यांचा मोठा दबदबा आहे. सध्या ते स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष आणि गोवा राज्य संपर्कनेते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

दरम्यान आता या वैधानिक आणि प्रशासकीय अनुभवाचा फायदा राज्यसभेत पक्षाची बाजू मांडण्यासाठी व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. या जागेसाठी त्यांनी प्रबळ दावेदारी केली असून ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!