लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार? मोठी अपडेट आली समोर…


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून ३००० रुपये एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारी महिना संपत आला तरी अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झाला नव्हता. सुरुवातीला हा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे निधी वितरण लांबले. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

आता राज्य सरकार दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र जमा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये थेट बँक खात्यात वर्ग केले जाऊ शकतात. यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसली तरी निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात रक्कम हस्तांतरित होऊ शकते. २ आणि ३ मार्च रोजी होळीचा सण असल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे होळीपूर्वी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही लाभार्थी महिलांना ६००० रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते; पण केवायसी त्रुटी किंवा आधार लिंकिंग समस्येमुळे मागील ३-४हप्ते थांबले होते, त्यांना थकीत सर्व रक्कम एकत्र दिली जाणार आहे.

त्यामुळे चार महिन्यांचे मिळू ६००० रुपये खात्यात येऊ शकतात. हप्ता न मिळाल्यास महिलांनी आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का आणि डीबीटी सेवा सक्रिय आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!