मोठी बातमी! अजितदादांचे 12 आमदार शरद पवारांच्या पक्षाच्या संपर्कात? राष्ट्रवादीच विलीनीकरण होणार…


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.त्यातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार असल्याची शक्यता आता जास्त वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावीत, अशी इच्छा होती. त्यानंतर आता अजितदादांचे हे 12 आमदार विलीनीकरणासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे अशी आमची इच्छा असल्याचं त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान मुंबईत झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सुद्धा विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे समजत आहे. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली आहे. आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काम करण्याची या 12 आमदारांची इच्छा असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाकडून लिखित प्रस्ताव आल्यावर चर्चा केली जाणार असल्याचेही समोर आलं आहे. यावर आता कधी शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!