उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर ; धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची’ त्या’ प्रकरणी थेट पक्षातून हकालपट्टी


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका राजकीय पदाधिकाऱ्यांने शेतीच्या नावाखाली चालवलेला धक्कादायक प्रकार गेल्या दोन दिवसापूर्वी उघडकीस आला. ठाकरे गटाचे वाशी उपतालुकाप्रमुख समाधान उघडे याच्या शेतातून तब्बल 485 किलोची अफूची झाडे जप्त करण्यात आली. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी मोठी कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, समाधान उघडे यांनी अत्यंत चालाखीने पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन शेतात अफुची लागवड केल्याबाबतची बाब पक्षाच्या निदर्शनास आली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यांनी पक्षाच्या भूमिकेला बाधा आणणारे आणि पक्षशिस्त भंग करणारे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांना पक्षातून हटवण्यात आले आहे.

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान मनोहर उघडे यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून तत्काळ प्रभावाने हकालपट्टी करण्यात येत आहे.पक्षशिस्त आणि संघटनात्मक नियमांचे पालन प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यास बंधनकारक आहे. पक्षाच्या विचारसरणी आणि अधिकृत भूमिकेविरुद्ध जाणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, याची स्पष्ट जाणीव सर्वांना करून देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून तब्बल 72 लाख 84 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!