मोठी बातमी!तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; मुंबई -पुण्यातील बोगस संस्थांचे धाबे दणाणले

पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जातात.दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावर रुजू झाल्यापासून त्यांनी आपले धडाकेबाज निर्णय कायम ठेवले आहेत. आता राज्यातील तब्बल 900 दिव्यांग संस्थांची नोंदणी त्यांनी रद्द केली आहे. यामध्ये मुंबईसह पुण्यातील संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे आता संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.

‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016’ नुसार जी विशेष नोंदणी लागते, ती या संस्थांकडे असणे अनिवार्य आहे. मात्र कोणतीही नोंदणी न करता दिव्यागांचा हक्काचा पैसा लुटणाऱ्या संस्थाचालकांना आता मोठा दणका बसला आहे. 2025 मध्ये 363 संस्थांवर धाड पडली आहे. यामुळे दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या पण नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या संस्थाचालकांना मोठा धक्का बसला आहे.
या कारवाईचा सर्वाधिक तडाखा मराठवाड्याला बसला आहे. यामध्ये सर्वात जास्त कारवाई छत्रपती संभाजीनगर मधील 103 संस्था मध्ये झाली आहे.त्यानंतर पुणे:60 संस्था,कोकण: 52संस्था,अमरावती: 50 संस्था,नाशिक आणि नागपूर: प्रत्येकी 49संस्था. या संस्थांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा नसून पारदर्शकतेचा अभाव जास्त आहे.

दरम्यान सरकारचा एक-एक रुपया फक्त आणि फक्त पात्र संस्थांच्या माध्यमातून खऱ्या दिव्यांगांपर्यंत पोहोचला पाहिजे या एकाच जिद्दीने मुंढेंनी ही मोठी कारवाई केली आहे.