ब्रेकिंग!शरद पवार यांना कधी मिळणार डिस्चार्ज ? मोठी अपडेट समोर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून आज त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू झाले. आता 5 दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवार यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. आज दुपारच्या सुमारास शरद पवार यांना डिस्चार्ज मिळू शकतो
शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये देखील चिंतेच वातावरण होतं.मात्र आता पवार कुटुंबीय आणि शरद पवार यांचे समर्थक, चाहते, पक्षाचे कार्यकर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यांच्या तब्येतीबददल समजल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दरम्यान डॉक्टरांचं एक पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होतं. त्यांच्या तब्येतीबद्दल वेळोवेळी माहितीही देण्यात येत होती. दरम्यान त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.