ब्रेकिंग!उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खलबत?


पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच तडकाफडकी दिल्ली दौरा केल्याची माहिती समोर आल्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्या दिल्लीत दाखल झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खलबत्त होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहेत. त्याच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक लागला. मात्र आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीत गेल्या असून त्या गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांच्यी राष्ट्रवादी ही एनडीएसोबत आहे. त्यामुळे विलीनीकरणाबाबत भाजपला देखील विश्वासत घेणे महत्त्वाचे आहे. यावर आता त्यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडील अर्थ खाते वगळता सर्व खाती त्यांना देण्यात आली आहेत. तसेच बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देखील त्यांना देण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!