ब्रेकिंग! शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; सलग 5 दिवस बेड रेस्ट…


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांना श्वास घ्यायला त्रास उद्भवत होता त्यामुळेडॉक्टरांनी त्यांना पुढील 5 दिवस रुग्णालयातच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना छातीत कफ साचल्यामुळे अस्वस्थता जाणवत होती. यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. तसेच बोलतानाही त्रास जाणवत होता. त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर तातडीने बारामती वरून पुण्यात दाखल करण्यात आलं.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. विविध औषधोपचारांद्वारे त्यांच्या छातीतील कफ कमी करण्यावर भर दिला जात आहे. शरद पवारांचा वाढता जनसंपर्क आणि धावपळ लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पूर्णतः बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे.

दरम्यान डॉक्टरांच्या या 5 दिवसांच्या सल्ल्यामुळे शरद पवार यांचे आगामी सर्व नियोजित दौरे आणि गाठीभेटी रद्द करण्यात आले आहेत. साहेबांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, फक्त विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवले आहे,अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!