ब्रेकिंग! अजित पवार पूर्व विदर्भातील नेत्याला भेटायला थांबले होते का? त्यांच्याकडे कोणती फाईल होती? रोहित पवारांच्या शंकेमुळे खळबळ


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. या अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेकांनी घातपाताचा संशय केला आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत प्रजेंटेशन सादर केले. यावेळी अपघातावेळीचा संपूर्ण टाईम लाईन त्यांनी सादर केला.अजित पवार बायरोड पुण्याला येणार होते. मात्र, पूर्व विदर्भातील एका नेत्याला भेटायला ते थांबले होते का? अशी शंका उपस्थित केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या आदल्या दिवशी काय झाले याची देखील माहिती दिली. दादा बायरोड बारामतीला जाणार होते,मग ते का गेले नाहीत हे सांगताना रोहित पवार म्हणाले, पूर्व विदर्भातील एक मोठा नेता दादांना भेटायला येणार होता,त्यांच्या फाईलवर सही करायची होती म्हणून अजित पवार थांबले होते का? अशी शंका त्याने उपस्थित केली आहे. त्यामुळे हा नेता कोण असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

दरम्यान पूर्व विदर्भातील मोठा नेता कोण ? त्याच्याकडे कोणती फाईल होती याची चौकशी झाली पाहिजे असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी नेत्याचा उल्लेख केल्यामुळे हाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तसेच 28 तारखेला काय झाले याची टाईम लाईन रोहित पवार यांनी सादर केली. विमानाची नियोजित वेळ 7 वाजताची होती. मग विमान 8:10 ला का निघाले? दादा कधीच उशिरा पोहोचत नाही. मग विमानाची वेळ का बदलण्यात आली? दादा कधीच रिस्क घ्यायचे नाही साहिल मदन आणि को. पायलट यश यांना एनवेळी का बदलण्यात आले? सकाळी 7 वाजता पूर्ण क्रू विमानतळवर पोहोचले होते. असे अनेक प्रश्न उपस्थित केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!