मोठी बातमी!भाजपाचे नेते नारायण राणे तातडीने जसलोक रुग्णालयात दाखल, काय आहे कारण?

मुंबई : भाजपाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांना तातडीने मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित उपचारासाठी नारायण राणे यांना रुग्णायलात दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशानंतर भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांचा कणकवलीत सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. आता आपण किती करणार असे देखील त्यांनी म्हटले होते. दोन्ही मुले कतृत्वान असून त्यांना नांदा सौख्यभरे असा आशीवार्द देखील त्यांनी एका सभेत दिला होता.
मुंबईतील जसलोक रुग्णालयात नारायण राणे यांना यापूर्वीही जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. त्यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार हे समोर आलं नव्हतं.मात्र आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर हृदयाशी संबंधित उपचार होणार आहेत असे समोर आले आहे.

नारायण राणे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत.तें काही काळ राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत.आधी तें कट्टर शिवसैनिक होते त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कालांतराने ते भाजपमध्ये सामील झाले. आपल्या फटकळ भाषेसाठीही ते ओळखले जातात. आता त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.