मंत्रालयात अजित पवारांच्या खुर्चीला नमन, सुनेत्रा पवारांनी स्वीकारली सूत्रे; लेकाला अश्रू अनावर..


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्या पदाची सूत्रे कधी स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना आता अजित पवारांच्या दशक्रिया विधिनंतर त्यांनी आज मंगळवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.मात्र या प्रसंगाला अजितदादांच्या निधनाची भावनिक किनार होती.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्याच खुर्चीवर बसताना पत्नी सुनेत्रा पवार यांनी खुर्चीला नमन करून उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले.उपस्थित असणाऱ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांना आधार दिला.

अजित पवार यांचा दशक्रिया विधी होईपर्यंत बारामतीत थांबलेल्या सुनेत्रा पवार सोमवारी मुंबईला आल्या. उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना चैत्यभूमीवर जाऊन वंदन केले तसेच सिद्धीविनायकाच्या चरणी लीन झाल्या. त्यानंतर सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांनी मंत्रालयात पाऊल ठेवले. अजित पवार यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांनी राज्यातील लोकांच्या सेवेसाठी प्रण केला. अजित दादाच्या निधनानंतर या भावनिक क्षणी उपस्थितांचे डोळे पाणावले.

दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाच बैठक होणार आहे. या बैठकीला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार उपस्थित राहणार आहे. त्याआधी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह त्यांनी प्रि-कॅबिनेटला हजेरी लावली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!