बारामती पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले; विशेष संक्षिप्त मतदार यादी कार्यक्रम जाहीर., अंतिम यादीची तारीख काय?


पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे.या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 हा अर्हता दिनांक धरून प्रारूप मतदार यादी 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप यादीवर नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी देण्यात येणार असून, 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दावे-हरकती स्वीकारले जाणार आहेत.

मतदार यादीत नाव नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती किंवा पत्त्यात बदल यासाठी संबंधित मतदारांना या कालावधीत अर्ज करता येणार आहे. प्राप्त दावे-हरकतींची छाननी केल्यानंतर अंतिम मतदार यादी 10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.दरम्यान पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत योग्यरीत्या नोंदले आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाव नसल्यास फॉर्म क्रमांक सहा भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक आठ भरावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

दरम्यान, या प्रक्रियेमुळे बारामतीत पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, राजकीय वर्तुळातही घडामोडींना सुरुवात झाली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!