ब्रेकिंग!अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार? संध्याकाळी होणाऱ्या रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबीयांसह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात असतानाच अजित पवारांचे पुतणे रोहित पवार आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेतून मोठा खुलासा करणार करणार आहेत.त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात मोठ्या वेगवान राजकीय घडामोडी घडल्या.निधनाच्या चौथ्याच दिवशी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मागील 14 दिवसापासून अजित पवारांच्या अपघातावर शरद पवार वगळता पवार कुटुंबातील कोणीही भाष्य केलेलं नव्हते. आज त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार संध्याकाळी 4 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेत आहेत. यातून मोठमोठे धक्कादायक खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार रोहित पवारांनी पोस्ट करून माहिती दिली की, बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली होती. अजित पवार यांचा घातपात करण्यासाठी विमानात सुसाईड बॉम्बरचा वापर करण्यात आला असावा का? असा संशय उपस्थित करण्यात आला आहे.