भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार, जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल; जाणून घ्या आता पर्यंत कोणाला किती जागा…

पुणे : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी, शनिवारी, मतदान पार पडलं. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. एकूण 25 हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 485 जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- 176, शिवसेना शिंदे गट- 109, राष्ट्रवादी अजित पवार गट- 95, काँग्रेस- 42, शिवसेना ठाकरे गट- 25, राष्ट्रवादी शरद पवार गट- 15, इतर- 25 जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

दुपारी 1 वाजेपर्यंतची आकडेवारी…
भाजप- 176
शिवसेना शिंदे गट- 109
राष्ट्रवादी अजित पवार गट- 95
काँग्रेस- 40
शिवसेना ठाकरे गट- 25
राष्ट्रवादी शरद पवार गट- 15
इतर- 25