निवडणुकीच्या वादातून भाजपच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला ;पेठ येथील मारहाणप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल …..

उरुळी कांचन : निवडणुकीत झालेल्या वादाचे पर्यवसन भांडणात,होऊन भाजपच्या पंचायत समितीच्या उमेदवाराच्या घरात घुसून
लोखंडी रॉडने बेदम मारहाण झाल्याचा प्रकार पेठ (ता.हवेली )येथे घडला असून पाच जणांवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी कोरेगाव मूळ पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार सूरज भालचंद्र चौधरी (वय -३३ रा. चारवाडा पेठ ता. हवेली , जि.पुणे ) असे मारहाण झालेल्या उमेदवाराचे नाव असून त्यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार विजय रामचंद्र चौधरी , ओम विजय चौधरी, तानाजी विलास चौधरी , हर्शद राजेश चौधरी , विशाल दिपक चौधरी सर्व रा. पेठ ता.हवेली जि.पुणे) यांच्यावर जमाव जमवून हल्ला करणे आदी कलमाअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काल झालेल्यामतदानाच्या वादानंतर रविवार सकाळी ११च्या सुमारास उमेदवार सूरज चौधरी हे त्यांचे भाऊ अक्षय, संदेश, वडील भालचंद्र, आई शोभा, पत्नी संध्या, भावजय सानिका व लहान मुले असे यांच्यासमवेत घरात बसले होते. यावेळी अचानक मोठमोठयाने शिवीगाळ करीत आरोपी विजय रामचंद्र चौधरी त्यांचा मुलगा ओम विजय चौधरी हे त्यांच्या घरात घुसून विजय चौधरी यांनी हातात एक चाकु तर ओम चौधरी याने हातात एक लोखंडी रॉड घेऊन वडील भालचंद्र यांना हाताने मारहाण केली.

यावेळी फिर्यादी यांचा भाउ अक्षय हा मध्ये आला असता विजय चौधरी याने त्याचे हातातील चाकु त्यांचे पोटावर मारुन दुखापत केली. तसेच आई शोभा यांना विजय व त्याचा मुलगा ओम याने त्यास सुध्दा हाताने मारहाण केली तसेच लोखंडी रॉड तसेच लाथा,बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील सामानाची तोडफोड करून ते लोक निघुन गेले घरातील 1 लाख रुपयांची रक्कम चोरी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.