महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून शासनाची फसवणूक; सात जनावर गुन्हा दाखल


पुणे : पुणे महापालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता धायरी परिसरात इमारत उभारून त्यातील फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.बनावट कमेन्समेंट प्रमाणपत्र, कम्प्लिशन प्रमाणपत्र आणि मंजूर बांधकाम आराखड्यांच्या आधारे दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सह दुय्यम निबंधक व्हि.डी. कासेवाड यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार 10 डिसेंबर 2024 रोजी घडला होता. स्वामीराज डेव्हलपर्स यांनी धायरी परिसरात स्वामीराज नावाची इमारत उभी केली होती.या इमारतीतील फ्लॅट विकण्यात आले होते. या व्यवहाराचा दोस्त कर्वेनगर येथील सह दुय्यम निबंध कार्यालयात नोंदवण्यात आला. त्यानुसार नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करत असताना मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार करण्यात आलेल्या पडताळणीत शंका निर्माण केल्या नंतर हा प्रकार उघडकीस झाला.

या सर्व प्रकारानंतर स्वामीराज डेव्हलपर्सचे भागीदार संदिप दामोदर कडू (वय ३८, रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), यांच्यासह सहा जनावर वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये साईनाथ वासुदेव सपकाळ (वय ३७, रा. तृप्ती गार्डन, आनंदनगर, सिंहगड रोड), महेश महाबळेश्वर नाईक (वय २५), रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), आश्रफ खलील शेख (वय २५, रा. हर्ष पॅलेस, आनंदनगर, सिंहगड रोड), संदेश राजू आवळे (वय ३४), प्रियंका संदेश आवळे (वय २९, रा. स्वामीराज बी, वडगाव धायरी) यांचा समावेश आहे.

. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३३६(३), ३४०(२), ३१८ (४), ३ (५) तसेच नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट प्रमाणपत्र,बांधकाम मंजुरी नकाशे तयार करून ते खरे असल्याचे भासवत दस्त नोंदणी केली व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ती पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. २) यांच्याकडे पाठविण्यात आली. 17 फेब्रुवारी 2025 रोजी उपअभियंता कार्यालयाकडून त्यांना पत्र प्राप्त झाले.या पत्रानुसार, धायरी येथील सर्व्हे नं. १०५, हिस्सा ५/१ या ठिकाणी नमूद बांधकामास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!