ब्रेकिंग! अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण; पायलटला हिप्नोटाइज केल्याचा आरोप

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर राज्यातील अनेक नेत्यांकडून संशय़ व्यक्त केला जात आहे.या मृत्यू प्रकरणात आता महत्त्वाचा एंगल समोर आला आहे.अजितदादांच्या विमानाच्या पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां? कारण, पायलेटने MAYDAY कॉल दिला नाहीये. टेकऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं, मात्र, तेही त्याने केलं नव्हतं. असे अनेक प्रश्न आमदार अमोल मिटकरीनीं उपस्थित केले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानात बसले होते. ती व्हीएसआर विमान कंपनी आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लॅक लिस्टमध्ये होती. वर्षांभरापासून त्या कंपनीवर बंदी होती. दुसरीकडे डिसेंबर 2025 च्या महिन्यात VSR कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
जर 50 कोटींचा विमा पायलटच्या नावावर उतरवला गेला असेल, आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला, त्याला हिप्नोटाइज केल होते का?, त्याला आमिष दाखवलं होत कां? असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला. त्यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान दादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या पत्र परिषदेकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. मला अपेक्षा आहे 10 तारखेच्या पत्रकार परिषदमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील, असे आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे.