लाडक्या ‘दादा ‘च्या जाण्याचा धक्का ; तेरावा होत नाही तोपर्यंत…, सुप्रिया सुळेंनी घेतला मोठा निर्णय


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या विमान अपघातानंतर पवार कुटुंबीयासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर अजित पवारांचीं बहीण अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेनीं मोठा निर्णय घेतला आहे.

सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं आहे की, जोपर्यंत अजित दादांना जाऊन तेरा दिवस होत नाहीत तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना मी कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देणार नाही. तेरा दिवस झाल्यानंतर मी प्रसिद्धी माध्यमांशी बोलेन, असे त्यांनी सांगितलं आहे.

एकीकडे रोहित पवार यांनी मौन बाळगलं असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे या दररोज अजितदादांसोबतचे फोटो आपल्या स्टेटसला ठेवत आहेत. आज बाराव्या दिवशीही अजितदादांच्या सोबतचा एक फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला अन् आपलं दु:ख व्यक्त केलं. अशातच सुप्रिया सुळे यांनी तेरावा होत नाही तोवर माध्यमांशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी देखील अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस वर’ मन फार दुखी आहे’ अशी भावनिक प्रतिक्रिया देखील दिली होती. तसेच हार्ट ब्रेकिंग म्हणजे ह्रदयविदारक आणि तुटलेल्या हृदयाचीं इमोजी लावलेली दिसत आहे. भावाच्या निधनामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!