अखेर प्रतीक्षा संपली! केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची वेबसाईट लॉचं, 18 प्रश्नांची प्रश्नावली


पुणे: आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने वेतन आयोगाची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे. साईट लॉन्च झाल्यानंतर आठव्या वेतन आयोगाने सरकारी मंत्रालय, कर्मचारी आणि सहभागीदार यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत. या आयोगाचे काम सुरू करण्यासाठी दिल्लीतील चंद्रलोक भवन मध्ये कार्यालय देखील देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी भरती प्रक्रिया देखील वेगवान होणार आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या वेबसाईट मध्ये अधिसूचना,मीडिया कॉर्नर आणि संदर्भ अटीसह असंख्य वैशिष्ट्य आहेत. वेबसाईट वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य याद्दल माहिती देखील प्रदान करते.8 व्या वेतन आयोगाची अधिकृ वेबसाईट, संकेतस्थळ तयार करण्यात आले असून ते लाईव्ह आहे. आयोगाने हे संकेतस्थळ लाँच केले आहे. वेतन आयोगाची साईट 8cpc.gov.in अशी आहे. या साईटवर गेल्यावर सध्या काय कामकाज सुरू आहे. वेतन आयोगाची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर आहे.

वेतन आयोगाने आपल्या नवीन वेबसाईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, 8व्या केंद्रीय वेतन आयोगाला चांगली माहिती देण्यासाठी तुमचे विचार, सूचना आणि इतर माहिती शेअर करा. हे इनपुट MyGov.in च्या वेब पोर्टलर एक 18 प्रश्नावलीतून व्यवस्थितरित्या मागवण्यात येत आहेत.

वेतन आयोगाने असे म्हटले आहे की, या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांची नावे उघड केली जाणार नाहीत आणि प्रश्नावलींच्या उत्तरांचे विश्लेषण आणि प्रकटीकरण एकत्रित ओळखलेल्या आधारावर केली जाईल. उत्तरे सादर करण्याची शेवटची तारीख सोमवार 16 मार्च 2026 असणार आहे. ही वेबसाईट कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!