जिल्हा परिषदेसाठी हवेली तालुक्यात ६८.०२ टक्के मतदान ; उद्याच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष ….

उरुळी कांचन : पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीच्या तब्बल ८ वर्षानंतर होऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुकीत हवेली तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेची लढाई झाली असून तालुक्यात ६ जिल्हा परिषद व १२पंचायत समित्यांच्या गणात अत्यंत चुरशीने मतदान पार पडले आहे. या गटात व गणांत प्रतिष्ठेची लढाई असलेल्या आव्हाळवाडी-थेऊर ,लोणीकंद- पेरणे व उरुळीकांचन -सोरतापवाडी जिल्हा परिषद गटांत प्रतिष्ठेच्या लढाईंंनी चुरशीने मतदान झाले आहे.

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातून ६ जिल्हा परिषद गटांत व १२ पंचायत समिती गटांत चुरशीची लढाई होत आहे. प्रतिष्ठेच्या असलेल्या या गट व गणांत शनिवारी(दि.७)रोजी अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
पुणे महानगरपालिकेनंतर हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांत काय होणार म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. अपेक्षाप्रमाणे या गटांत मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदारांनी प्रतिसाद देऊन निवडणुकीसाठी उत्सुकता दाखविली आहे. हवेली तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी अत्यंत नियोजनपूर्ण निवडणुक प्रक्रिया राबविल्याने या अत्यंत प्रभावी नियोजनाची तालुक्यात चर्चा आहे. त्यांच्या अत्यंत काटेकोर व पारदर्शक नियोजनाने मतदानकेंद्रावर सर्व साहित्य व सुविधांनी यंत्रणा प्रभावी ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावर मतदार यंत्राचा बिघाडाचा एकही घटना न घडता अत्यंत चुरशीने मतदानाची नोंद झाली आहे.

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद निहाय लोणीकंद – पेरणे गटात ३७, १०४ एकूण मतदानापैकी 28,365 मतदान होऊन ७६.४४℅ टक्के नोंद झाली आहे. केसनंद -कोरेगाव मूळ गटात ३८,९२४ पैकी २७,५९४ मतदान होऊन७०.८९ टक्के मतदान झाले आहे. उरुळीकांचन-सोरतापवाडी गटात ३७,७२५ पैकी २२,६५४ पैकी ६०% टक्के मतदान,थेऊर -आव्हाळवाडी गटात ४०,७६७ पैकी ३०७४० मतदान होऊन ७५.४०%तर लोणीकाळभोर -कदमवाकवस्ती गटात ५१,३३६ पैकी२९४८२ होऊन ५७.२४ %टक्के मतदान तर खेडशिवापूर -खानापूर गटात ४५,६८२ पैकी ३२२४६ मतदान होऊन ७०.५८ मतदान होऊन एकूण तालुक्यात ६८.०२% मतदान झाले आहे.
मुख्य लढती
लोणीकंद-पेरणे गट
प्रदिप कंद(राष्ट्रवादी ) किरण साकोरे (भाजप)
केसनंद-कोरेगावमूळ गट
सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी) कविता पायगुडे (भाजप)
उरुळीकांचन -सोरतापवाडी गट
जितेंद्र बडेकर (राष्ट्रवादी) शंकर बडेकर (भाजप)
थेऊर-आव्हाळवाडी गट
कोमल आव्हाळे (राष्ट्रवादी) ऋतुजा सावंत (भाजप)
लोणीकाळभोर-कदमवाकवस्ती गट
शितल कांबळे (राष्ट्रवादी) पूनम गायकवाड (भाजप) खेड
शिवापूर-खानापूर गट
पुजा पारगे (राष्ट्रवादी) , सारीका पायगुडे (भाजप )